पुणे, : मराठवाड्यासारख्या भागात मराठा आणि मुस्लिम वंचित घटक असल्याची स्थिती आहे. शिवाय मराठा समाजाचा मुस्लिम आरक्षणाला कायमच पाठिंबा राहिला असून खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. तरीही मराठा समाजाचे आरक्षण रद्द करावे, ही याचिका का ? असा सवाल उपस्थित करत मराठा-मुस्लीमांमध्ये भांडण लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी केला आहे.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सराटे 'सरकारनामा'शी बोलत होते. मुस्लिम आरक्षणाविरोधात मराठा समाजाने कधीही भूमिका घेतलेली नाही, असेही सराटे यांनी स्पष्ट केले.
सराटे म्हणाले, "" मराठा आणि मुस्लिम समाजात फूट पडावी या उद्देशानेच ही याचिका दाखल झाली असून यामुळे मराठा समाज दुखावला गेला आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवालाच्या बाबींवर विधिमंडळात आक्षेप घेण्याची संधी असताना, तिथे असे कोणतेही आक्षेप घेतल्याची नोंद नाही. पण आता अचानक त्यांनी मराठा समाजाचे 16 टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केलेली आहे. तसेच न्या. गायकवाड आयोगाचा अहवाल रद्द करण्याची मागणी अवास्तव असून या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे"
"वास्तविक, मराठा समाजाने किंवा कोणत्याही मराठा व्यक्तीने मुस्लीम आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही. तरी आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे", असेही डॉ. सराटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.