Maharashtra Political Parties sarkarnama
पुणे

Maval Assembly Election 2024: मावळवर महायुतीतील तीनही पक्षांचा दावा; आघाडीकडे अद्याप उमेदवारच नाही?

NCP Ajit Pawar Faction's Bapu Bhengde Rejects Vice-Chairman Post: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: विधानसभेचे बिगुल वाजताच आता उमेदवारीसाठी सर्वच पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात रस्सीखेच आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला आमदार मावळ तालुक्याला मिळाला. मात्र आता या विधानसभेला महायुती मधीलच सर्व पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.

मावळ हा भाजप हा पारंपरिक मतदारसंघ असल्याचा दावा केला जातो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनीही या मावळ मतदारसंघावर दावा केला आहे. सध्या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दुसरे इच्छुक बापू भेगडे हे आहेत.

भाजपचे रवींद्र भेगळे यांनीही जोरदार तयारी केली आहे. खर तर महायुतीमध्येच या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असताना महाविकास आघाडीकडून मात्र कोणताही बलवान उमेदवाराचा चेहरा नाही. त्यामुळे या निवडणुकीत एखाद्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की महाविकास आघाडीवर ओढवण्याची शक्यता असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको.

मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी, अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली. परंतु यामुळे आता विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला अजित पवार गटातूनच विरोध होत असल्याचे दिसते.

मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 94 हजार 833 पुरुष आणि 1 लाख 85 हजार 451 स्त्रिया तसेच 13 तृतीयपंथीय असे एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार असून एकूण 402 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT