Shirur LokSabha Constituency 2024 Sarkarnama
पुणे

Lok Sabha 2024: ठाकरेंचे उमेदवार ईफ्तार पार्टीत, तर शिंदेंचे मेट्रोत; डिजिटल प्रचारातही प्रत्यक्ष भेटीवर भर

Maharashtra Lok Sabha Election2024: शिरूरला युतीतील राष्ट्रवादी, तर मावळात आघाडीतील शिवसेनेने दावत ए ईफ्तारमधून प्रचार केला. प्रत्यक्ष प्रचारावरच सगळ्यांचा व त्यातही पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर मतदारसंघातील प्रमुख आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचा भर असल्याचे दिसले.

उत्तम कुटे

Pimpri: राजकारणात काहीही घडू शकतं, पक्ष आपली तत्त्व खुंटीला कशी अडकवून ठेवतात, हे महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षांत पाहिले. त्याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही येत आहे. सत्ता व विजयासाठी कशाचेही वावडे पक्ष, त्यांचे नेते, उमेदवारांना नसते, हे त्यातून दिसून आले.

डिजिटल क्रांतीमुळे सध्याचा बहुतांश निवडणूक प्रचार हा ऑनलाइन झाला आहे. तरीही अनेक राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांचा भर प्रत्यक्ष भेटीवर म्हणजे ऑफलाइन प्रचारावरही असतो. उमेदवारी अर्ज दाखल केला नसला, तरी तिकीट मिळाले असल्याने सध्या परंपरांगत म्हणजे प्रत्यक्ष प्रचारावरच सगळ्यांचा व त्यातही पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval LokSabha 2024) आणि शिरूर मतदारसंघातील (Shirur LokSabha Constituency 2024) प्रमुख आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचा भर असल्याचे दिसले. शेवटच्या टप्प्यात तसेच प्रचाराची मुदत संपल्यानंतर तो ऑनलाइन होणार आहे.

मावळमधील आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी घाटाखालील तळोजा येथील मशिदीत जाऊन नुकताच आपला प्रचार केला. त्या भागात मुस्लिम मतदार जास्त आहेत. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यानिमित्त आयोजित दावतमध्ये वाघेरे आणि त्यांचे कार्यकर्ते नुकतेच सामील झाले.

तेथे अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, असे त्यासंदर्भात वाघेरेंनी `सरकारनामा`ला सांगितले. मुस्लिम बांधवांनी तुमच्याबरोबर असल्याचा शब्द दिल्याचा दावा त्यांनी केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी युतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (ता.३) घाटावर प्रचार केला. पिंपरी ते दापोडी असा मेट्रो प्रवास करीत त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

Maharashtra Lok Sabha Election2024:

उमेदवाराचे चिरंजीव इ्फ्तेहार पार्टीत

दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदासंघातील युतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) उमेदवार शिवाजीराव आढळराव आहेत. त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या डायनालॉग इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव कोंढवा येथील दावत ए ईफ्तार पार्टीत काल (ता.३) संध्याकाळी सहभागी झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हडपसरचे आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते. या मेजवानीत हिंदूही होते हे पाहून बरे वाटले, असे अक्षय यांनी `सरकारनामा`ला आज सांगितले. आयोजकांना मी या दावतमध्ये सामील झाल्याने बरे वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited by: Mangesh Mahale

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT