BJP  Sarkarnama
पुणे

Maval Loksabha Election 2024 : मावळ लोकसभेसाठी भाजपा गंभीर; कोअर कमिटीने फडणवीसांची भेटही घेतली!

उत्तम कुटे: सरकारनामा

Loksabha Election 2024 : मावळ (जि.पुणे) लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद ही शिवसेनेपेक्षा खूप जास्त असल्याने ही जागा पक्षाकडे घेऊन लढविण्याची मागणी या मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या लोणावळा येथील बैठकीत शुक्रवारी (ता.23) करण्यात आली. त्यानंतर लगेचच या कमिटीने शनिवारी (ता.24) थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यातून मावळ लढण्याविषयी भाजपा गंभीर असल्याचे दिसून आले.

देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी मावळ लोकसभा कोअर कमिटीतील घाटावरील आणि घाटाखाली सदस्यांनी भेट घेतली.

यामध्ये माजी राज्यमंत्री आणि मावळ भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे, पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष शंकर जगताप, मावळचे निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, मावळ तालुका अध्य़क्ष दत्तात्रेय गुंड आदींचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मतदारसंघात पक्षाची ताकद जास्त असल्याने मावळची जागा आपल्याकडे घेऊन ती लढविण्याची मागणी त्यांनी फडणवीसांकडे(Devendra Fadnavis) केली. मात्र, पुण्यातील कार्यक्रमाला जायचे असल्याने या विषयावर फडणवीसांना या कमिटीशी चर्चा करता आली नाही. त्यांनी त्यावर विचार करतो असे सांगितले. तसेच पुढील चर्चेसाठी कमिटीला त्यांनी मुंबईला बोलावले.

महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे(Srirang Barane) यांनी मावळातून आपली उमेदवारी अगोदरच जाहीर करून टाकली आहे. त्यानंतर युतीतील राष्ट्रवादी व आता भाजपने त्यावर दावा केल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे. ते व त्यांच्या पक्षाचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे भाजपाच्या मावळ कोअर कमिटीने फडणवीसांची भेट घेतली तेव्हा उपस्थित होते. त्यामुळेही फडणवीसांना या कमिटीशी चर्चा करता आली नाही.

दरम्यान, मावळात लोकसभेला भाजपाचे(BJP) उमेदवार म्हणून बाळा भेगडे, शंकर जगताप यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचेही नाव घेतले जात आहे. त्यातूनच उमेदवार बाहेरचा न देण्याची मागणी मावळ कोअर कमिटीने लोणावळ्यातील शनिवारच्या बैठकीत केल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT