Ajit Pawar, Krishnarao Bhegade Sarkarnama
पुणे

Krishnarao Bhegade passes away : "ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नव्हतं..." : मार्गदर्शक नेतृत्वाच्या जाण्याने अजितदादा भावूक; 15 दिवसांपूर्वीच झाली होती भेट

Ajit Pawar On Krishnarao Bhegade Death : पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं शेती, सहकार, शिक्षण, उद्योग, व्यापार, अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

Sudesh Mitkar

Pune News, 01 Jul : पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. भेगडे हे मावळ तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं होतं.

त्यांच्या निधनानं शेती, सहकार, शिक्षण, उद्योग, व्यापार, अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

अजित पवार म्हणाले, दोनच आठवड्यापूर्वी 17 जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जावून मी भेगडे साहेबांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेव्हा त्यांना बोलतांना त्रास होत होता, परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.

ती आमची शेवटची भेट ठरेल, असं कधीच वाटलं नाही. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, असं अजित पवार म्हणाले. तसंच कृष्णराव भेगडे साहेब सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते मावळचे नगराध्यक्ष झाले.

1972 ला जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत मावळचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 1977 ला काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 1978 ला पून्हा आमदार झाले. विधान परिषदेवरही ते दोन टर्म आमदार म्हणून निवडून गेले.

नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिर सारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचं काम केलं आहे. पुण्याच्या औद्योगिक, आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीत त्यांचं मलाच योगदान होतं.

मावळभूषण, शिक्षणमहर्षींसारख्या अनेक पदव्या, पुरस्कारांनी सन्मानित कृष्णराव भेगडे यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं निधन ही मावळ तालुक्याची, पुणे जिल्ह्याची, महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT