Narendra Modi-Murlidhar Mohol News | Murlidhar Mohol Latest News
Narendra Modi-Murlidhar Mohol News | Murlidhar Mohol Latest News  Sarkarnama
पुणे

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात महापौर मोहोळ ठरले ‘मॅन ऑफ दी डे’

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी पुण्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले.पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण आणि मेट्रोचा शुभारंभ हे प्रमुख कार्यक्रम होते. नदी सुधार योजनेच्या दोन प्रकल्पांचा शुभारंभदेखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला.पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा वावर आणि पंतप्रधानांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना दिलेले प्राधान्य हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होता.पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात महापौर मोहोळ हेच खऱ्या अर्थाने ‘मॅन ऑफ द डे’ ठरले. (Murlidhar Mohol News Updates)

महापौर असल्याचे मोहोळ यांना हा सारा मान मिळणे अपेक्षितच होते. तरीही पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक ठिकाणी महापौर मोहोळ यांना जाणीवपूर्वक मान दिल्याचे दिसते.सारे कार्यक्रम आटोपून निघतानादेखील लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी मोहोळ यांना उद्देशून ‘मेयरसाहब गुडबाय’ ! असे म्हणत निरोप घेतला.

कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून तसेच कोनशिलेचे आवरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. यावेळी महापौर काहीसे दूर होते हे पाहून पतंप्रधान मोदी यांनी त्यांना हाक मारली. मात्र. त्यांना ती ऐकू आली नाही हे लक्षात येताच राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आपल्या खास शैलीत मोहोळ यांना हाक मारली ते म्हणाले, ‘मुरली इधर आओ, प्रधानमंत्री बुला रहे है ! हा प्रसंगदेखील महापौरांसाठी महत्वाचा होता.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्टेशनवर कोनशिलिचे अनावरण झाले. यावेळी एका बाजूला पिंपरी-चिंचवडच्या मापौर माई ढोरे होत्या. महापौर मोहोळ काहीसे दूर होते हे पाहताच मोहोळ यांना हाक मारत पंतप्रधानांनी आपल्या शेजारी उभे केले.पुणे महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला सर्व नगरसेवक उपस्थित होते.या सर्वांना पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची इच्छा होती. ‘‘नगरसेवक आपको मिलना चाहते है’’ ! अशी विनंती महापौर मोहोळ यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर आवश्‍य मिलेंगे, असे म्हणत सारा ‘प्रोटोकॉल’ बाजूला सारून पंतप्रधान मोदी थेट नगरसेवकांच्या दिशेने गेले. सर्वांना नमस्कार केला. यावेळी काहीजणांनी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढल्या.

महापालिकेतील कार्यक्रम,मेट्रोच्या उदघाटनादरम्यान महापौरांना दिलेला प्रतिसात असो व भाषणात त्यांचा केलेला विशेष उल्लेख या साऱ्यातून पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांना एक सुवर्णसंधी मिळाली याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली.महापौर असल्याचे त्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीस निश्‍चितच उपयोगी ठरेल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT