अमित शाह-मुरलीधर मोहोळ

 

सरकारनामा

पुणे

महापौर मोहोळांची अशीही शिवभक्ती; स्वखर्चातून उभारताहेत सव्वादोन टनांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा !

देशाचे गृहमंत्री थेट पुणे महापालिकेत येण्याची ५२ वर्षांनंतरची पहिलीच वेळ होती.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) जुन्या इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chtrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधिष्ठ ब्रॉंझचा पुतळा साकारत असून त्याची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. हा पुतळा महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून साकारण्यात येत असून यासाठी तब्बल दोन हजार २०० किलो ब्रॉंझ वापरण्यात येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर (Vivek Khatavkar) यांच्या हातून ही कलाकृती घडत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. देशाचे गृहमंत्री थेट पुणे महापालिकेत येण्याची ५२ वर्षांनंतरची पहिलीच वेळ होती. तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पुणे महापालिकेत येणारे शाह हे पहिलेच गृहमंत्री ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारकासाठी शाह यांनीही खास वेळ दिली, हे विशेष.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य करताना आदर्श कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. पुणे शहराचा गाडा हाकत असताना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर असावा आणि महापालिका कारभाऱ्यांना सातत्याने प्रेरणा मिळत राहावी, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात पुतळा असावा, अशी मनोमन इच्छा होती.’’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारकाची पायाभरणी देशाच्या कणखर गृहमंत्र्यांच्या हस्ते झाली, याचे मोठे समाधान आहे. विशेष म्हणजे या सिंहासनाधिष्ठ पुतळ्याच्या उभारणीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेली कौतुकाची थाप आम्हा सर्वांसाठी कामाचा उत्साह वाढवणारी आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

'देशाच्या अवकाशात ज्यावेळी अंधःकाराचे वातावरण होते, दुरदूरवर आशेचा किरण नव्हता. स्वराज्य शब्द उच्चारणे हेही भीती निर्माण करणारे होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुणांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण स्वराज्यासाठी समर्पित केले. पुढे याच स्वराज्याचा दोन तृतीयांश भारतात विस्तार झाला.अष्टप्रधान मंडळाने उत्तम प्रशासनाचे उदाहरण जगाला दाखवून दिले. म्हणूनच पुणे महापालिकेने उभारलेला सिंहासनाधिष्ठ पुतळा सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दांत शाह यांनी पुतळा स्मारकाचा गौरव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT