Medha Kulkarni  Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni News : मेधा कुलकर्णींची राज्यसभेवर वर्णी लागणार?, पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Medha Kulkarni and Rajya Sabha Election 2024 : मेधा कुलकर्णी यांनी अचानकपणे पालिकेकडे 'हा' अर्ज केल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

Chaitanya Machale

Pune BJP News : कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगपालिकेच्या मिळकतकर विभागाकडे 'नो ड्यूज ’ सर्टीफिकेटसाठी अर्ज केला आहे. कुलकर्णी यांनी अचानकपणे पालिकेकडे हा अर्ज केल्याने सुलट चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेच्या जागांसाठी येत्या महिना अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. मात्र यासाठीची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच आता मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांनी पालिकेकडे 'नो ड्यूज ’ सर्टीफिकेटसाठी अर्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Medha Kulkarni and Rajya Sabha Election 2024

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. मात्र 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.

मतदार संघाच्या विद्यमान आमदार असतानाही तसेच आमदार म्हणून देखील कुलकर्णी यांनी आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडली होती. असे असतानाही पक्षाने अचानक त्यांना उमेदवारी नाकारल्याने या भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्राच्या समितीवर केली आहे.

पक्षाने दिलेली ही जबाबदारी पार पाडताना कुलकर्णी यांनी अनेक कार्यक्रम घेत पक्षाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातात. राज्यसभेसाठी भाजपने(BJP) कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस केल्यास आगामी लोकसभेच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी

राज्यसभेच्या रिक्त पदांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणुक होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. आमदारांचे बलाबल लक्षात घेता भाजप आणि मित्र पक्षांचे 5 उमेदवार विजयी होतील. तर कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या वाटयाला एक जागा राहील. परंतू सध्याचे फोडाफोडीचे राजकारण पाहाता सहाव्या जागेवरही भाजप उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे.

लोकप्रतिनिधींना उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानीक स्वराज्य संस्थांची कोणतीही देणी देणे बाकी नसल्याचे सर्टीफिकेट आवश्यक असते. त्यातच त्यांनी यासाठी अर्ज केला आहे. पुण्यातून त्यांच्या एकमेव मागणी अर्जामुळे याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

... असे तर्क बांधले जात आहेत -

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजपने यापूर्वी कसबा विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना तर गेल्या लोकसभेमध्ये गिरीश बापट यांना उमेदवारी दिली होती.

काही दिवसांपूर्वी या दोन्ही लोकप्रतिनिधींचे निधन झाल्याने सध्या भाजपकडे ‘ब्राह्मण’ समाजाचे प्रतिनिधीत्व नाही. या पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे तर्क बांधले जात आहेत. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT