Medha Kulkarni.jpg Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni Garba Issue: नागरिकांचे फोन मेसेज आले अन मेधा कुलकर्णी प्रचंड संतापल्या, मग थेट जाऊन गरबाच बंद पाडला

Pune Navratri Events 2025 : गेल्या काही दिवसांपासून गरबा कार्यक्रमावरून राज्यातील राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून गरब्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच प्रवेश द्यावा अशी मागणी लावून धरली जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून गरबा कार्यक्रमावरून राज्यातील राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून गरब्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच प्रवेश द्यावा अशी मागणी लावून धरली जात आहे. अशातच भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी कोथरूड मध्ये सुरू असलेला गरबा कार्यक्रम बंद पाडला असल्याचं समोर आला आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यातील विविध भागांमध्ये गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं अशाच एका गर्भ कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील शास्त्रीनगर भागात करण्यात आलं होतं. या गरबा कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड असा त्रास होत असल्याचं सांगत मेधा कुलकर्णी यांनी थेट गरबा कार्यक्रमांमध्ये धाड टाकत हा कार्यक्रम बंद पाडला असल्यास समोर आला आहे.

या गरबा कार्यक्रमाला शनिवारी (ता.27) सायंकाळी सुरुवात झाली होती. गरबा कार्यक्रम रंगात आला असताना अचानक मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या. त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याचा सांगितलं. तुमच्या कार्यक्रमाबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याचे देखील त्या म्हणाल्या. त्यावर नंतर स्टेजवर जात त्यांनी माईक हातात घेत हा कार्यक्रम आता पुढे सुरू राहणार नाही, असं देखील सांगून टाकलं.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, गरबा कार्यक्रमाचा खूप आवाज होत आहे. आपण आरतीसाठी गेले असताना अनेकांनी येथील गोंगाटाचे व्हिडिओ आपल्याला काढून पाठवले. हवेतर मी व्हाट्सअप वरील व्हिडिओ देखील दाखवते.

याच परिसरात राहणारे एक लिव्हर कॅन्सर झालेले पेशंट आहे. एक ९० वर्ष वृद्ध व्यक्ती आहे, त्यांची या कार्यक्रमामुळे कशी अवस्था होत असेल. तुम्हाला योग्य वाटतं का? तुमच्या घरीही आजी, आजोबा असतील. आजारी माणसे असतील, लहान मुलं असतील. असं भाजपच्या (BJP) खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

तसंच हा कार्यक्रम आजपासून येथून या ग्राऊंडवर होणार नाही. आजुबाजुच्या परिसरातील लोकांना आवाजाचा मोठा त्रास होतोय. हा कार्यक्रम नियमभंग करून होतोय. सर्व धार्मिक नियम तोडून कार्यक्रम होतोय. आवाजाची मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे शास्त्री नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असल्याची माहिती खासदार कुलकर्णी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT