पुणे : हिजाबच्या विषयावरून कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात राजकारण होऊ नये यासाठी गृहमंत्री या नात्याने दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse-Patil) यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना सूचना द्याव्यात, अशी मागणी मुंबईतील ‘एमआयएम’चे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
हिजाब वापरण्याच्या विषयावरून कर्नाटकात सुरू असलेला वाद सध्या उच्च न्यायालयात पोचला आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार शेख यांनी महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधितांना सूचना कराव्यात असे आवाहन गृह मंत्री पाटील यांना पत्र लिहून केले आहे.
या पत्रात आमदार शेख म्हणाले, ‘‘ कर्नाटकात शिक्षण संस्थांमध्ये समान गणवेश अनिवार्य करण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या आदेशामुळे त्या राज्यात धार्मिक वाद चिघळला.त्यामुळे त्याचे पडसाद देशभर व इतर राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री या नात्याने आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यातून महाराष्ट्र राज्य हे वैचारिकरित्या पुढारलेले आहे हे पुन्हा एकदा देशातील इतर राज्यांना दाखवून दिले.’’
आपण भूमिका स्पष्ट केली असली तरी राज्यात महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या मुंबईतील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मणीबेन एम.पी. शाह वूमन कॉलेजच्या माहिती पत्रकात (Prospectus) विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्याबाबत बंदी असल्याचे आमदार शेख म्हटले आहे.
राज्यात इतर शिक्षण संस्थामध्येदेखील विद्यार्थिंनींना हिजाब परिधान करण्याबाबत बंदी असू शकते. त्यामुळे सदर बाब ही भेदभावजनक असून धार्मिक तणाव संघर्ष वाढवणारी आहे.प्रत्येकाला भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क बहाल केले असून वेश परिधान करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये वेश परिधान करण्याबाबत असलेला निर्णय कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार व दुजाभाव करणारा असता कामा नयेत, याबाबत आपण संबंधितांना सूचना द्याव्यात, असे आमदार शेख यांनी म्हटले आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.