Dattatray Bharne Amol Mitkari .jpg Sarkarnama
पुणे

MLC Election NCP: विधान परिषद उमेदवारीवरुन नाराज मिटकरींना मंत्री भरणेंनी फटकारलं; म्हणाले,'सुनेत्रावहिनींनी भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून..'

Vidhan Parishad News: विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत नाराजीनाट्य रंगलं आहे. त्यात अमोल मिटकरी यांनी पक्षावरच टीका केली आहे, तर ठाण्याचे नेते आनंद परांजपे हेही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Pune News : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानं महायुतीला त्यांच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा सिद्दीकी यांना ताकद देत विधान परिषदेची संधी दिली आहे.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी(ता.1 मे) विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या इच्छुकांना फटकारलं आहे. ते म्हणाले,सुनेत्रा वहिनींनी भावूक होऊन नाही,तर सिनिअरिटी आणि मेरिट पाहूनच झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

मंत्री भरणे म्हणाले, अमोल मिटकरी यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा.पक्षाचा कोणताही निर्णय हा सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जातो. तसेच बाबा सिद्दीकी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं मुंबईसाठीचं योगदान आणि काम खूप मोठं राहिलं आहे. तसेच झिशान सिद्दीकी हेही मुंबईचे आमदार राहिले असल्याचं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केल आहे.

मिटकरींचं विधान काय?

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत नाराजीनाट्य रंगलं आहे.त्यात अमोल मिटकरी यांनी पक्षावरच टीका केली आहे,तर ठाण्याचे नेते आनंद परांजपे हेही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. त्यात विधान परिषदेची उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खदखद मिटकरी यांनी व्यक्त केली होती.

तसेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी यापुढे भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यात जो साथ देईल त्याच्यासोबत असेल असं म्हणत अमोल मिटकरींनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत. उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदारानं आपल्याला फोन केला नसल्याची नाराजीही पक्षानं बोलून दाखवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT