Anna Bansode
Anna Bansode sarkarnama
पुणे

तुकोबारायांच्या पालखीसाठी आमदार बनसोडेंकडून २१ किलो चांदी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर प्रथमच पंढरीची वारी होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा देहूबाहेरील पहिला मुक्काम असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांचा (Pimpri-Chinchwad) उत्साह त्यामुळे ओसंडून वाहतो आहे. या तुकोबारायांच्या वारीतील दररोजच्या अभिषेक सामग्रीसाठी (नवीन चांदीचा मखर, सिंहासन, पादुका, अभिषेक पात्र) पिंपरीचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी २१ किलो चांदी नुकतीच अर्पण केली. त्यातून घडविण्यात आलेले हे नवे अभिषेक साहित्य येत्या शनिवारी (ता.१८) सकाळी विधीवत पूजा करून संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) संस्थान देहूचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे व इतर विश्वस्तांकडे सुपूर्त केले जाणार आहे.

नितीन महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व देहू संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. माणिक महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प संजय महाराज मोरे, ह. भ. प मधुकर महाराज मोरे यांना बोलावून यथोचित पूजा करून नुकतीच ही चांदी बनसोडे यांनी अर्पण केली होती. या दानाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या वारकऱ्यांची सेवा होत असल्याबद्दल त्यावेळी त्यांनी संतोष व्यक्त करीत स्वतला भाग्यवान म्हटले होते.

आता या चांदीतून घडविण्यात आलेल्या अभिषेक सामग्रीची पालखीचा मुक्काम असलेल्या शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते बनसोडे यांच्या काळभोरनगर, आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयापर्यंत दिंडी मिरवणूक शनिवारी सकाळी काढण्यात येणार आहे. तदनंतर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष चैतन्य महाराज देगुलकर, ह. भ. प गहनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह इतर नामवंत कीर्तनकार महाराजांचे मार्गदर्शन व आशीर्वादपर प्रवचन होणार आहे. या अर्पण व पूजन सोहळ्याच्या तयारीची आज बैठक झाली.

पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने हा अर्पण सोहळा होत असून तो दरवर्षी घेणार असल्याचे बनसोडेंनी यावेळी सांगितले. सिद्धार्थ बनसोडे, उद्धव कोळपकर, सामाजिक कार्यकर्त्या नीता ढमाले, सतीश गव्हाणे, सोपान मुळे, विश्वनाथ वखारे, पांडुरंग फुगे, सुरेश काटे, गुलाब काटे, माऊली भदाले, गोकुळ भुजबळ, अण्णा कापसे, विजय भोंडवे, किशोर पाटील, माधुरी ओक, ज्योती कानिटकर, गजरा काटे, मा. नगरसेवक प्रसाद शेट्टी, निलेश शिंदे, मुकेश सोमय्या, संजय ढमाले, सतीश लांडगे, लहू तोरणे, शशिकांत घुले, संजय औसरमल आदी नियोजन व तयारी बैठकीला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT