Ashok pawar
Ashok pawar Sarkarnama
पुणे

आमदार अशोक पवारांच्या सुरक्षेसाठी दोन हत्यारी पोलिस तैनात

भरत पचंगे

शिक्रापूर : जिवे मारण्याच्या धमकीनंतर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तात्काळ दोन हत्यारी पोलिस २४ तास सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. सदर संरक्षण जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंत ठेवले जाणार असून जिल्हा पोलिस अधिक्षक संरक्षण समितीने हा निर्णय तात्काळ घेतला व कार्यान्वितही केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली.

आमदार अशोक पवार यांचा `महेंद्र मल्लाव` करु, असे म्हणून लिखीत स्वरुपातील एक पत्र शिरुरमधील काही पदाधिका-यांच्या घरी पाठविण्यात आले होते. या पत्राची दखल घेत राष्ट्रवादीसह भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि मनसेनेही धमकी देणाराचा निषेध तर केलाच शिवाय पवार यांना पोलिस संरक्षणाची मागणीही केली.

याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला एक निवेदन देवून फोनवर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.देशमुख यांचेसोबत चर्चाही केली होती. या शिवाय भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनीही आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करुन सदर निवेदन लगेच जिल्हा पोलिस अधिक्षकांना पाठवित असल्याचेही कालच (ता.१९) जाहीर केले होते.

त्यालाच अनुसरुन डॉ.देशमुख यांनी त्यांच्या अधिपत्याखाली व अध्यक्षतेखाली असलेल्या संरक्षण समितीत तात्काळ निर्णय घेतला व त्याची तात्काळ अंमलबजावणी करीत दोन हत्यारी पोलिस २४ तास आमदार अशोक पवार यांच्या संरक्षणासाठी तैनात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT