Dattatray Bharne, Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

Datta Bharne : शिरसटवाडीतील मतदान केंद्रावर आमदार दत्ता भरणेंची कार्यकर्त्यांना दमदाटी

Shirasatwadi election tension Datta Bharne workers involved in intimidation: तालुक्यातील शिरसटवाडी मधील मतदान केंद्रात शिरुन आमदार दत्तात्रय भरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Sachin Waghmare

Pune News : इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होता आहे. या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत हायहोल्टेज लढत होत आहे. इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. तालुक्यातील शिरसटवाडी मधील मतदान केंद्रात शिरुन आमदार दत्तात्रय भरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी मधील मतदान केंद्रात शिरुन आमदार दत्तात्रय भरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केली. यावेळी त्यांनी काही कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी मतदानावेळी घडला. या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

माजी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी बुधवारी दुपारी शिरसाटवाडीतील मतदान केंद्रावर गेले. यावेळी मतदान केंद्रात शिरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी केली. भरणे यांनी दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT