Satish Wagh Sarkarnama
पुणे

Satish Wagh Murder Case : भाडेकरुलाच दिली 5 लाख रुपयांची सुपारी; ...म्हणून आमदाराच्या मामीनंच रचला मामाच्या हत्येचा कट

5 lakh contract For killing Satish Wagh : आता या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात सतीश वाघ यांची पत्नीच या हत्येमागची मास्टरमाईंड असल्याचं समोर आल्यानं पोलिसही चक्रावून गेले आहेत. मोहिनी सतीश वाघ (वय 45) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे.

Deepak Kulkarni

Pune Crime News : काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या अपहरण आणि हत्येप्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांचा मृतदेह उरळी कांचनजवळील शिंदवणे घाटामध्ये आढळून आला होता. या घटनेनंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्थएवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच पुणे पोलिसांवर (Pune Police) टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत आता वाघ यांंच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत मोठं यश मिळवलं आहे.

आता या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात सतीश वाघ यांची पत्नीच या हत्येमागची मास्टरमाईंड असल्याचं समोर आल्यानं पोलिसही चक्रावून गेले आहेत. मोहिनी सतीश वाघ (वय 45) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यापूर्वी या प्रकरणी पोलिसांनी पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30, रा. फ्लॅट नंबर 201 लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 31, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28, रा. बजरंगनगर, वाघोली, मूळ रा. अहिल्यानगर), अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय 29, रा. फ्लॅट नंबर 305, विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) आणि अतिश संतोश जाधव (वय 20, लोणीकंद, मुळ रा. धाराशिव) यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकानं सतीश वाघ (Satish Wagh) यांच्या पत्नीला या हत्येप्रकरणी बुधवारी (ता.25) अटक केली आहे. या अटकेनंतर या खून प्रकरणात प्रथम वाघ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अक्षय जावळकर याने 5 लाख रुपयांची सुपारी देऊन वाघ यांचा खून केल्याची केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तपासात सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी वाघ यांच्याच पत्नीने दिल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली असून, तपास सुरू केला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 59) यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण करून त्यांचा उरुळी कांचन भागातील शिंदेवणे घाटात खून करण्यात आला होता. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना त्यांचं ब्ल्यू बेरी हॉटेल समोरुन अपहरण करण्यात आलं होतं. या अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता.

सतीश वाघ यांंचे अपहरण केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळून आला होता.यानंतर पोलिसांनी हा खूनच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता.त्यानंतर या हत्येप्रकरणी पोलिसांची 16 पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागली होती. पोलिसांच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरली होती. वाघ यांचा खून केल्यानंतर पोलीस सातत्याने आरोपींच्या मागावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT