पुणे

आमदार कुल खोटे रेटून बोलणारा बहाद्दर गडी : रमेश थोरात 

संतोष काळे

राहू : दौंडचे आमदार खोटे बोलण्यात पटाईत आहेत, हे दौंडच्या जनतेला माहीत आहे. खोटे रेटून बोलणारा हा बहाद्दर गडी आहे, अशा शब्दांत माजी आमदार रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर टीका केली. 

आमदार  कुल यांनी रमेश थोरात यांचे नाव न घेता, ""वय वाढल्यानंतर माणूस विचारी होतो, असे म्हणतात. पण यांच्या बाबतीत तसे काही नाही. यांचे वय वाढल्याने ते कसेपण आणि कधीपण बरळतात'', अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना थोरात यांनी कुल यांचा खरपूस समाचार घेतला. पाटेठाण (ता. दौंड) येथे सात दिवसांपासून सुरू असलेले चक्री उपोषण खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीनंतर मंगळवारी (ता. 13) मागे घेण्यात आले. या प्रसंगी झालेल्या सभेत थोरात यांनी आमदार कुल यांना चांगलेच लक्ष केले. 

थोरात म्हणाले, ""प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पाणी नको, त्यांच्या संपादित जमिनी परत करा. मात्र, हे आमदार महाशय म्हणतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी मिळाले पाहिजे. भामा आसखेडचे पाणी मिळूच शकत नाही. आपण किती खरे आणि खोटे बोलता हे सामान्य जनतेला माहिती आहे. जनता काय आता दूधखुळी राहिली नाही. उगाच आपले इतभर लाकूड आणि हातभर दपली करायची. भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दुजाभावाची वागणूक दिली. राहू बेट परिसरात चार वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रास देऊन बाहेरील लोक आणून घुसखोरी करण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून सुरू आहे. 

या प्रसंगी माऊली शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, सभापती झुंबर गायकवाड, रामभाऊ टुले, भाऊसाहेब ढमढेरे, बाळासाहेब थोरात, नितीन दोरगे, योगिनी दिवेकर, पाटील यादव, सरपंच ज्योती यादव, ज्योती झुरंगे, पुरुषोत्तम हंबीर, संदीप लगड, नितीन गायकवाड, विलास डुबे, सचिन शिंदे, मनोज हंबीर, योगेश डुबे, आश्रू डुबे, गणपत डुबे उपस्थित होते. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT