Laxman Jagtap
Laxman Jagtap Sarkarnama
पुणे

गंभीर आजारातून उठताच शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा झाले आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेत २०१७ ला प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपचा (BJP) पाच वर्षाचा कार्यकाळ यावर्षी १३ मार्चला संपला. ता. १४ मार्चपासून प्रशासक म्हणून पालिका आय़ुक्तांचा कारभार सुरु झाला आहे. त्यानंतर शहराचे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी जीवघेण्या आजारातून बरे होताच प्रशासनाला धारेवर धरण्यास आता सुरवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत दोन मुद्यांवरून त्यांनी पालिका प्रशासक तथा प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. (MLA Laxman Jagtap became aggressive; Attack on the Muncipal Corportaion administration)

प्रशासकीय कारभार सध्या सुरु असल्यामुळे महापौर निधीतून गरीब रुग्णांना देण्यात येणारी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत बंद झाली आहे. त्यामुळे त्यांची अधिक कुचंबणा सध्या सुरु आहे. म्हणून पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करण्याची मागणी आ.जगतापांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आज केली.महापौर निधीतून मदत न मिळणे हा शहरातील गरीब रुग्णांवर अन्याय असल्याने प्रशासनाने त्यावर मार्ग काढायला हवा होता. पण तसे झालेले नाही. प्रशासन अजूनही गाढ झोपेतच आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे पालिका त्यांच्या हद्दीतील गरीब रुग्णांसाठी 'शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवते.त्याअंतर्गत गरीब नागरिकांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. तेथील उपचारांसाठी पालिकेकडून एक लाख रूपयापर्यंत आर्थिक मदत त्यांना दिली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

आमदार जगतापांनी तीन दिवसांपूर्वीच पिंपरी पालिकेच्या हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून सबंधित पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी प्रशासकांकडे केली होती. या मशीन खरेदीची निविदा म्हणजे एक प्रकारचा गडबड घोटाळा असल्याचे सांगत त्यात निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून पुरवठादार ठेकेदाराला संबंधित अधिकाऱ्यांनी पात्र केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या मशीनमध्ये चुकीचे ऑपरेटिंग सिस्टिम, चुकीचा एअर फ्लो, व्हायरस फिल्टर नसणे, उच्चतम आवाज पातळी, मशीनमध्ये मेंब्रेन प्रणाली नसणे, इलेक्ट्रिक शॉक न लागण्याची प्रणाली नसणे, सॉलीडीफायडर नसणे यांसह अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णांसह त्या मशीन हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर निविदा रद्द करून सबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT