Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

PCMC News : A/H3N2 चा पिंपरी-चिंचवडमध्ये बळी; प्रशासन सतर्क, अधिवेशनसोडून आमदार धावले मतदारसंघात

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News: 'स्वाईन फ्लू' च्या A/H3N2 या नव्या विषाणूने पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिला बळी गेल्याने शहरातील भाजपचे दोन्ही आमदार राज्य विधीमंडळाच्या मुंबईतील अर्थसंकल्पी अधिवेशनातून तातडीने माघारी फिरले.

भोसरीचे भाजप आमदार तथा या पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगेंना स्वाईन फ्लूच्या शहरातील बळीची बातमी कळताच ते मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबरोबर सायंकाळी बैठक घेऊन हा संसर्ग रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेतला.

शहरात सध्या या आजाराच्या सक्रिय रुग्णांची संख्या शून्य असली, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आ.लांडगे यांनी केले आहे.

नवनिर्वाचित आ.जगतापही माघारी

शहरातील स्वाईन फ्लूच्या बळीची माहिती मिळताच या अर्थसकल्पी अधिवेशनातच शपथ घेतलेल्या चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप या सुद्धा शहरात परत फिरल्या आहेत.

तत्पूर्वी त्यांनी फोनवरून आयुक्त शेखरसिंह तसेच वैद्यकीय विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली. या संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी अधिक दक्षता घेण्याची व सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराची सक्षम सुविधा उभारण्याची सूचना केली. त्या ही प्रशासनाबरोबर बैठक घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT