पुणे

आमदार मिसाळ पुणे भाजपच्या शहराध्यक्षा; गणेश बीडकर सरचिटणीस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची आज सायंकाळी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्यासह नगरसेवक गणेश बीडकर यांना सरचिटणीस नेमण्यात आले आहे. मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मोहरे बदलले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांच्याशी उमेदवारीची स्पर्धा करणारे गोगावले यांना बदलण्यात आले. मिसाळ यांना नेमून बापट गटही वरचढ होणार नाही, याची काळजी चंद्रकांतदादांनी घेतल्याचे सांगण्यात येते.

बीडकर यांची निवड अनेक कार्यकर्त्यांना अनपेक्षित होती. बीडकर हे सध्या पाटील यांच्या जवळचे मानले जातात. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. शहरातील राजकारणात ते सक्रिय नव्हते किंवा ते सक्रिय राहू नयेत, याची काळजी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतली होती. बीडकर हे देखील बापट यांच्या गटातील मानले जात नाहीत. त्यामुळे पाटील यांनी आपला वरचष्मा शहर संघटनेवर राहील, असे पाहिल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT