MLA Rahul Kul raises concern over the disrespectful mention of Shivaji Maharaj in the CET exam, demanding strict action. Sarkarnama
पुणे

CET Exam Controversy : CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; दोषींवर कारवाई करण्याची भाजप आमदाराची मागणी

MLA Rahul Kul Demands Action : 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB 3 Year CET ऑनलाइन परीक्षेतील सामान्य ज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आणि आदर्श राज्यकर्ते असलेल्या थोर महापुरुषांचा उल्लेख अशा एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 05 Apr : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या LLB 3 Year CET परीक्षेत 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.

2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB 3 Year CET ऑनलाइन परीक्षेतील सामान्य ज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आणि आदर्श राज्यकर्ते असलेल्या थोर महापुरुषांचा उल्लेख अशा एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अनेक परीक्षार्थींनी आमदार राहुल कुल यांच्याकडे निवेदन देत दाद मागितली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुल यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई येथील आयुक्तांना पत्र पाठवून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समिती व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कुल यांनी पत्रात काय म्हटलंय?

दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागांतर्गत "शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते" असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करताना अत्यंत अनादरपूर्वक 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.

ज्या राजांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली आणि ज्यांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे होणे ही खेदाची बाब आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर प्रश्नपत्रिका संकलित करणाऱ्या समितीवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.

CET सेलने या गंभीर चुकीबद्दल सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची नियमावली तयार करावी. इथून पुढे सर्व शैक्षणिक साहित्यात 'छत्रपती शिवाजी महाराज' असाच उल्लेख अनिवार्य करावा. तरी आपण या विषयाचे गांभीर्य ओळखून, LLB-3 Year CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संबंधित दोर्षीवर कारवाई करण्याबाबत आपणाकडून संबधितांना आदेश व्हावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT