पुणे

राहू ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल गटाचेच वर्चस्व

...

संतोष काळे

राहू :  राहू (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीवर  आमदार राहुल कुल समर्थक शंभू महादेव जनसेवा पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार दिलीप  देशमुख 1508 मतांनी विजयी झाले. शंभू महादेव जनसेवा पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र विरोधी शंभू महादेव ग्रामविकास पॅनलला एकही जागा जिंकता न आल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचा मात्र सुपडा साफ झाला.

सरपंचपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे कंसात दिलीप देशमुख विजयी (2686 ),  सचिन शिंदे (1178),  गोरख जगताप (131), संतोष नवले (277), लक्ष्मण सोनवणे (173), चंद्रकांत सोनवणे (64 ) नोटा साठी 37  मतदान झाले.

वाॅर्डनिहाय निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे:

वार्ड क्रमांक 1 अक्षय चव्हाण (508),

वाॅर्ड क्रमांक 2 -गणेश सोपान शिंदे (793), विशाल दिलीप जगताप (714 ),  रूपाली अरुण कुल (748),

वाॅर्ड क्रमांक 3-  सतीश मारुती नवले (808 ),  सोनाली योगेश सोनवणे (848 ),

वाॅर्ड क्रमांक 4- संतोष अशोक पवार (553),  प्रमिला अशोक शिंदे (409) , अश्विनी योगेश गाढवे (193),

वाॅर्ड क्रमांक 6 रामचंद्र गोविंद कदम (277), पूनम सागर शिंदे (269)

बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे ज्ञानेश्वर उर्फ माऊली जयवंत शिंदे, सुनिता गणेश कुदळे, सुनंदा सिताराम शिंदे,  काजल सुरेश आबणे, पुतळाबाई गौतम जाधव या बिनविरोध निवडून आल्या.  अनुसूचित जमाती प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे ती एक जागा रिक्त आहे.  अशी माहिती
निवडणूक निर्णय अधिकारी  विनोद धांडोरे, अर्जुन स्वामी यांनी दिली.

सरपंपदासाठी थेट प्रथमच जनतेतून निवड होत असल्यामुळे या  निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निवडीनंतर ग्रामदैवत शंभू महादेवाचे दर्शन सर्व विजयी उमेदवारांनी घेतले यावेळी विजयी सभा झाली. यावेळी आमदार राहुल कुल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  308 मतदारांनी नोटासाठी मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT