Rohit Pawar-Ram Shind
Rohit Pawar-Ram Shind Sarkarnama
पुणे

'मी आमदारकीचा राजीनामा देतो; रोहित पवारांनीही राजीनामा देऊन कर्जत-जामखेडच्या मैदानात उतरावे'

सरकारनामा ब्यूरो

बारामती : मी मागच्या दाराने आमदार झालो, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणतात. माझं रोहित पवार यांना खुलं आव्हान आहे. मी सहा वर्षांसाठी आमदार झालोय; पण माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, त्यांनीही राजीनामा द्यावा आणि समोरासमोर निवडणूक लढवून कर्जत-जामखेड मतदार संघातील लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे तपासून घ्यावे, अशा शब्दांत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले. (MLA Ram Shinde's challenge to Rohit Pawar to re-contest election)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ सप्टेंबरपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शिंदे यांनी रोहित पवारांना आव्हान दिले.

ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातल्या पांदण रस्त्यांच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. कुठल्याही कामाबाबत तक्रार असल्यास चौकशीला सामोरे जायला पाहिजे. मात्र, विद्यमान आमदार रोहित पवार म्हणतात माझे काम चांगले आहे, त्यामुळे चौकशी करण्याची गरज नाही.

रोहित पवारांना आलेल्या सक्तवसुली संचानलयाच्या (ईडी) नोटिशीबाबत राम शिंदे म्हणाले की, आतापर्यंत त्यांना तीन नोटीसा आल्या आहेत. पण बहुधा त्यांचा अभ्यास सुरू आहे. ईडीला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. खासदार संजय राऊत यांनीही सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT