वाल्हे : ‘‘गुंजवणी योजनेचे काम सन १९९३च्या जुन्या कालव्याप्रमाणेच जिरायती भागामधूनच करणार असून, यासाठी शेतकऱ्यांसह संघर्षाची भूमिका घेतली आहे. कामाला विलंब झाला तरी चालेल, पण शेतकऱ्यांचे नुकसान आणि ठेकेदाराचा फायदा होणाऱ्या चुकीच्या कामाला शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीतील आमच्या सर्वांचा कायम विरोध राहील. जुन्या सर्वेप्रमाणेच योजना करणार आहे,’’ अशी ग्वाही आमदार संजय जगताप यांनी दिली.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे प्रचाराच्या कोपरा बैठकीत आमदार जगताप बोलत होते. शनिवारी (ता. ९) हरणी, जेऊर, मांडकी, वाल्हे परिसरातील वाड्या आणि जेजुरी ग्रामीण परिसरातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. गुंजवणीबाबत ते म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात सन २००८मध्ये गुंजवणी धरणाचे ९८ टक्के काम पूर्ण होते.त.’’
त्यावेळी पुरंदरच्या राजकारणात शिवतारे यांचा प्रवेशही नव्हता. नंतर उर्वरित २ टक्के कामासाठी त्यांना सन २०१७ उजाडला. सन २०१८ मध्ये १३१३ कोटींची द्वितीय सुप्रमा घेत सन २०१९मध्ये विधानसभेच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी शिवतारे यांनी घाईगडबडीत एल अॅड टी कंपनीला ईपीसी पद्धतीने कंत्राट दिले. ईपीसी कंत्राट पद्धतीमध्ये योजनेच्या डिझाईनपासून वस्तू खरेदी करणे ते बांधकाम करण्यापर्यंतची सर्व कामे ठेकेदार करतो आणि राज्याच्या जलसिंचन विभागातील एकमेव ईपीसी कंत्राट आहे.
सन २०२० मध्ये ईपीसी कंत्राटाचा गैरफायदा घेत एल अॅण्ड टी कंपनीकडून जलवाहिनीच्या कामात बदल केला. त्यामुळे वाल्हे स्थानिक शेतकऱ्यांनी बदललेल्या बागायती भागातून जाणाऱ्या जलवाहिनीचे काम थांबविले. ईपीसी कंत्राट आणि चुकीच्या जलवाहिनीच्या कामामुळे प्रकल्प रखडला. राज्यात महाविकास आघाडीचे येणार असून, त्यामाध्यमातून गुंजवणी योजनेचे कामही पूर्णत्वास जाणार आहे.’’
माजी सभापती गिरीश पवार म्हणाले, ‘‘माजी आमदारांच्या काळात जेजुरी एमआयडीसीतील अनेक कंपन्या बंद झाल्या. काहींनी जागा घेऊनही कंपनी सुरु केल्या नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.