Bala Bhegade - Sunil Shelke Latest News Sarkarnama
पुणे

Shelke Vs Bhegade: 'मावळ' कुणाचा? बाळा भेगडेंना शेळकेंनी सांगितला 'बेसिक फॉर्म्युला'; ज्याचा आमदार, त्यांची जागा!

Mangesh Mahale

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत जागा वाटपावरुन वाद होण्याचे चित्र आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात (Maval Assembly Constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये 'मावळ'कुणाचा यावरुन रस्सीखेच सुरु आहे. मावळ विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आला आहे.

महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपने दावा ठोकला आहे. ही जागा कमळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. आता मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार, हे उघड आहे. मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी सांगितले.

अजित पवार गटाचे सुनील शेळके (Sunil Shelke) हे मावळचे आमदार आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळणार, हे जवळपास ठरले असतानाच भेगडे यांनी मतदारसंघावर दावा ठोकल्यामुळे 'मावळ'कोण लढवणार, यावर सध्या चर्चा सुरु आहे. सुनील शेळके यांनी त्याला उत्तर दिले आहे.

अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवर भाजप दावा करत असेल आणि हा दावा करताना राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेतील प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल तर हे योग्य नाही. असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी भाजप नेत्यांना जागा वाटपाच्या बेसिक फॉर्म्युला काय आहे, याची आठवण करुन दिली आहे.

ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाचा वाट्याला ती विधानसभा, असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरला आहे, असे असताना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा केला आहे. 2 ऑगस्टला मावळात मेळाव्याचे आयोजन केले. मात्र महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. मावळ लोकसभेत राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला आहे. त्यावर शंका घेत भाजप धरलेला हा आग्रह अयोग्य असल्याचे शेळके यांनी म्हटलं आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT