Supriya Sule Sharad Pawar Advice  sarkarnama
पुणे

Supriya Sule : 'एक कायम लक्षात ठेव, बारामती...', संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण

Supriya Sule Remembers Sharad Pawar Advice : आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे, असे सुळे म्हणाल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : बारामती लोकसभा मतदार संघामधून चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. आजपासून (सोमवार) संसदेच्या अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या पहिल्यांदा 2009 मध्ये खासदार झाल्या होत्या तेव्हा मोलाचा सल्ला दिला आहे. त्या संदर्भातील पोस्ट सुळेंनी सोशल मीडियावर केली आहे.

'सुप्रिया, तु खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव. मी जेंव्हा जेंव्हा संसदेत प्रवेश करते तेंव्हा तेंव्हा साहेबांची ही वाक्ये मला आठवतात, असे सुळे यांनी आपल्या फेसबूकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणतात, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हि माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की, माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.

सुप्रिया सुळेंनी दिले वचन

सलग चौथ्या वेळी संसदेत प्रवेश करीत असताना मला वाढत्या जबाबदारीची जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिल. लोकहिताचे मुद्दे संसदीय चौकटीत राहून मात्र अत्यंत आग्रही पणे सभागृहात मांडून त्याची तड लावण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन. लोकांनी माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते, असे देखील आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मित्र पक्षांचे मानले आभार

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी सर्वांचेच आभार सुप्रिया सुळे यांनी मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT