Tanaji Sawant, Aditya Thackeray
Tanaji Sawant, Aditya Thackeray  sarkarnama
पुणे

मुख्यमंत्र्यांनी घरी येण्याचे निमंत्रण स्वीकारताच तानाजी सावंत म्हणाले, कोण आदित्य ठाकरे?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी युवा सेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली. कोण आदित्य ठाकरे? तो फक्त एक आमदार आहे. अशी जहरी टीका तानाजी सावंत यांनी केली.

शिंदे गट उदयास आला यामध्ये आमदार सावंत यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान, तानाजी सावंत यांच्या घराशेजारी आदित्य ठाकरे यांची सभा झाली. ही सभा सुरू होण्याआधी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, त्याने काहीही फरक पडणार नाही. सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार असल्याचे सागंत सावंत यांनी टीका केली.

शिवाय आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे, असा टोलाही त्यांनी आदित्य यांना लगावला. बंडामध्ये सहभागी झाल्यानंतर सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. ही तोडफोड शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी केली होती, असा दावा सावंत यांनी केला. ज्यांनी कार्यालयाची तोडफोड केली त्यांनीही आवकातीमध्ये रहावे..कुणाशी पंगा घेताय हे डोक्यात ठेवावे, आता आमची सत्ता आहे, असा इशाराही सावंत यांनी दिला.

एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. तसेच शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यांच्या मेळाव्यालाही मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यानंतर ते सामंत यांच्या घरी भेट देणार आहेत. याच दरम्यान आदित्य यांची सभाही होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT