CM Devendra Fadnavis sarkarnama
पुणे

Pune Politics : पुण्यात पुन्हा नामांतराचा वाद पेटणार ! 'मोहम्मदवाडी'ला 'महादेववाडी'...; भाजप आमदार आक्रमक

Yogesh Tilekar Mohammadwadi Mahadevwadi : टिळेकर यांनी नमूद केले की, 1995 मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी एकमताने मोहम्मदवाडीचे नाव महादेववाडी करण्याचा ठराव केला होता.

Sudesh Mitkar

Pune News : काही दिवसापूर्वी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा छेडला होता. रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवरून मोठं वादंग पेटल्याचे पाहायला मिळाल. त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवत अनेकांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्यातील एका भागाचे नाव बदलावे, असा प्रस्ताव विधान परिषदेच्या सहभागृहात दिला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या मोहम्मदवाडी या भागाचे नाव महादेववाडी करण्याची मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनात "पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन" अंतर्गत त्यांनी हा मुद्दा मांडला.

टिळेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे, 1995 मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी एकमताने मोहम्मदवाडीचे नाव महादेववाडी करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर 1997 मध्ये हा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आणि त्यानंतर नामांतर प्रक्रियेवर विराम लागला. महापालिकेच्या नाव समितीकडे हा प्रस्ताव दिला गेला होता, मात्र नामांतराचे अधिकार महापालिकेकडे नसल्यामुळे हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.

अलीकडेच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी याच मागणीसाठी आंदोलन केले होते. आता आमदार टिळेकर यांनी ही बाब थेट विधिमंडळात मांडल्याने या मागणीला नव्याने चालना मिळण्याची शक्यता आहे.

टिळेकर म्हणाले की, “गेल्या तीन दशकांपासून ग्रामस्थ या नामांतरणाची मागणी करत आहेत. या भागात एकही मुस्लिम कुटुंब राहत नसल्याने, 1995 मध्येच नाव बदलण्याबाबत एकमताने ठराव झाला होता. मात्र, शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.”

शिवसेनेचा पाठींबा

मोहम्मदवाडीच्या नामांतराच्या या मागणीला शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीही पाठिंबा दिला असून, त्यांनी देखील राज्य शासनाला पत्र लिहून नामांतराची विनंती केली आहे. योगेश टिळेकर यांनी घेतलेल्या या नामांतराच्या मुद्द्यावरती आता वादंग निर्माण होणार का? राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टिने हा मुद्दा अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT