Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द : मुंबईकडे रवाना

Akshay Badve

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज यांच्यातील रंगणारा सामना तूर्त लांबणीवर पडला आहे.

पुण्यातील नदीपात्रात डेक्कन येथे ही सभा घेण्याचे नियोजन मनसेने केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी देण्यासाठी काही अटी सांगितल्या होत्या. पण नंतर मनसेनेचे पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र मनसेकडून डेक्कन पोलिसांना देण्यात आले. ही सभा होणार नसल्याने राज ठाकरे हे देखील आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाला. अन्यथा त्यांचा चार-पाच दिवस पुण्यात मुक्काम ठरला होता.

पुण्यात त्यांनी काल सुमारे 50 हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली. त्या वेळी माध्यमांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला वैतागून जगू देणार की नाही, असा सवाल करत त्यांना झापले. पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांशी त्यांनी या दौऱ्यात संवाद साधला. मुंबई, ठाणे, औरंगाबाद अशा तीन ठिकाणी राज यांच्या गेल्या दीड महिन्यांत सभा झाल्या. चौथ्या सभेसाठी पुण्याची निवड करण्यात आली होती. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज यांनी या शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या सभेविषयी मनसैनिकांत उत्सुकता होती. सभा रद्द झाल्याने मनसैनिकांना आता पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT