mns sarkarnama
पुणे

Cricketnama : मनसेने केला 'आप'चा झाडून पराभव; बाबू वागस्करांची जोरदार बॅटींग

राजकारणता वादळ उठवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सरकारनामाच्या मैदानावरही प्रतिस्पर्धी आपचा झाडून पराभव केला.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राजकारणता वादळ उठवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सरकारनामाच्या मैदानावरही प्रतिस्पर्धी आपचा झाडून पराभव केला. त्यामुळे या सामन्यातील दुसऱ्या दिवसीच्या पहिलेच मैदान मनसेने गाजवले. राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची शनिवारी सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानातली कामगिरीही जोरदारपणे रंगली होती. भाजप (BJP), शिवसेना, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp), महसूल, पोलिस प्रशासन अशा सर्वच पक्षांच्या टीमने मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली.

आज रविवारी क्रिकेटनामा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला लीग सामना मनसे (MNS) विरुद्ध आम आदमी पक्ष असा रंगला. गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसेची टीम मैदानात उतरली. यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे असे दिग्गज खेळाडू मैदानात उतरले.

तर शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या टीममध्ये मोहनिश येंदे, सरफराज शेख, गोवर्धन गोसावी, समीर आरवाडे, गणेश थरकुडे, विजय भुमकर, स्वप्निल गांगुरडे अशा खेळाडूंचा समावेश आहे. मनसेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मनसेने आपची पहिली विकेट दुसऱ्याच चेंडूवर काढली. स्वप्निल गांगुरडे एका धावेवर धावबाद झाले. आम आदमीची सुरुवात खराब झाली. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची जबरदस्त गोलंदाजी. सरफरजा शेख बाद. महाराष्ट्रन नवनिर्माण सेनेला फक्त २२ धावांची गरज आहे.

मनसेने जोरदार बॅटींग केली. बाबु वागस्करांनी जोरदार फटकेबाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये विजयाकडे त्यांनी वाटचाल केली. बाबु वागस्कर सामनावीर ठरले. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते बाबु वागस्करांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विजयानंतर मनसेने जोरदार जल्लोष केला. बाबु वागस्करांना खांद्यावर घेत मनसेने विजयोत्सव केला. मनसेचा हा विजयोत्सव पाहण्साठी स्वत मनसेचे नेते बाळा नांदगावर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT