Raj Thackeray News, Vasant More News, MNS News Sarkarnama
पुणे

कट्टर समर्थकानं मनसे सोडली पण वसंत मोरे देणार राज ठाकरेंना वाढदिवशी मोठं गिफ्ट!

मनसेतील अंतर्गत गटबाजीमुळं वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) पुण्यात लागलेली गळती सुरूच आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक आहेत. मोरे हेसुद्धा काही दिवसांपासून नाराज आहेत. असे असले तरी राज ठाकरेंना त्यांच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट देण्याची तयारी मोरेंनी केली आहे. (Vasant More News)

पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. त्यातच आता मोरेंचे समर्थकही पक्षातून बाहेर पडू लागले आहेत. यामुळे मोरेही पक्ष सोडतील, अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच मोरेंनी राज ठाकरेंच्या वाढदिवसांचा मोठं नियोजन केलं आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस 12 जूनला आहे. या निमित्तानं मोरे मोठा कार्यक्रम घेणार आहेत. त्यादिवशी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात शेकडो तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, असे मोरेंनी जाहीर केलं आहे. याचबरोबर प्रभाग क्रमांक 56, 57 आणि 58 मधील मनसेच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शहरातील मनसेच्या कार्यक्रमात मोरेंना डावलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोरेंनी या या उपक्रमातून उत्तर दिल्याचं मानलं जात आहे.

वसंत मोरे यांना पक्षात बाजूला करण्यात आले आहे. यानंतर मनसेला आता पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू आहेत. यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून निलेश माझिरे यांनी पक्ष सोडला आहे. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यावेळी माझिरे यांनी पक्षातच राहणार असल्याचा खुलासा केला होता. माझिरे यांनी पक्ष सोडला असला तरी ते कुठल्या पक्षात जाणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून मोरेंना वारंवार डावललं जात आहे. यावर राज ठाकरे हे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही वसंत मोरे यांनी जाहीरपणे घेतली होती. तेव्हापासून मोरे आणि मनसे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT