Maval death threat news : ठाणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे विभागप्रमुख राम पूर्णेकर यांच्या हत्येमुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच, आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मवाळ तालुक्याचे अध्यक्ष अशोक कुटे यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अशोक कुटे गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीविरोधात आवाज उठवत आहे. यातूनच त्यांना आता थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडे (Police) निवेदने देऊन कारवाईची मागणी केल्यानंतर ही धमकी मिळाल्याचा आरोप अशोक कुटे यांनी केला आहे. एका फोनवरून तीन जणांनी कुटे यांच्याशी संपर्क साधत ही धमकी दिल्याचा दावा अशोक कुटे यांनी केला आहे. तसे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत देखील त्यांनी म्हटले आहे.
अशोक कुटे आलेल्या धमकीवर तक्रार देण्यासाठी लोणावळा पोलिस ठाण्यात दाखल होताच, या घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. अशोक कुटे यांना कोणी धमकी दिली, याचा शोध घेतला जाणार असून, संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
मावळ तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच जर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असतील, तर अशा धमकीखोरांवर पोलिसांचा धाक कधी निर्माण होणार? या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.