Vasant More News, MNS News, Political News
Vasant More News, MNS News, Political News  sarkarnama
पुणे

MNS : वसंत मोरे अँक्टिव्ह ; शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच कार्यालयात हजर

सरकारनामा ब्युरो

पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची नाराजी दूर करण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांना यश आल्यानंतर मोरे आज पहिल्यांदाच मनसेच्या कार्यालयात आले आहेत. मशिदीवरील भोंगे प्रकरणावरुन त्यांना शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. तेव्हापासून ते पुण्यातील मनसेच्या कार्यालयात गेले नव्हते.

आज राज ठाकरे यांच्या हस्ते पु्ण्यात होणाऱ्या सदस्य नोंदणीच्या अभियानाला सुरवात झाली आहे. या अभियानासाठी मोरे कार्यालयात उपस्थित आहेत. शहराध्यक्षपदावरून त्यांना हटवल्यानंतर वसंत मोरे काही काळ नाराज होते. त्यामुळे त्यांनी "जोपर्यंत राज ठाकरे सांगणार नाहीत तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही," अशी भूमिका घेतली होती.

"मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक…" सदस्य नोंदणीसाठी मनसेचे हे नवीन घोषवाक्य समोर आले आहे. आजपासून मनसेचे(MNS) राज्यभरात सदस्य नोंदणी मोहिम सुरु होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत . मात्र या दरम्यान मी हिंदवी रक्षक आणि मी महाराष्ट्र सेवा असे हे घोषवाक्य असणार आहे. प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी हे घोष वाक्य वापरले जाणार आहे.

शस्त्रक्रियेनंतर आज प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज ठाकरे राज्यभर सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी देखील मनसेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आज राज ठाकरेंचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले आहे.

वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांना नवी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT