MNS On Marathi Name Plate  Sarkarnama
पुणे

MNS News : इंग्रजी पाट्यांची तोडफोड; पुण्यात मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

MNS On Marathi Name Plate : डेक्कन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

Mangesh Mahale

Pune : न्यायालयानं मराठी पाट्यासंदर्भात दिलेली मुदत संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठी पाट्या न लावल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्यासह राज्यभरात आंदोलन केले. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करून काळे फासले.

आज (ता.2) पुण्यात दुकानांवर मराठी पाट्या नसल्यानं मनसेकडून तोडफोड करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी डेक्कन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिळक रस्त्यावरील एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इंग्रजी पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत स्वनेंदू घोष यांनी फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. इंग्रजी पाटीचे नुकसान केले. जंगली महाराज रस्त्यावरील लेव्हीज शोरूम, शुभम टाइम्स, बुट्टे पाटील ग्रुपने लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड केली.

या प्रकरणी कुलदीप यादव, श्याम ताठे, प्रवीण मिसाळ, संदीप माने, प्रवीण सोनवणे, राजेंद्र वागस्कर, दादा साठे, योगेश खडके यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शाही भोज हाॅटेलचे मालक ब्येनाराम मनारामजी देवासी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT