Sanjay Raut,Raj Thackeray
Sanjay Raut,Raj Thackeray sarkarnama
पुणे

संजय राऊतांना लवंडे म्हणणारे राज ठाकरे पुन्हा राऊतांना म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांना 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राज ठाकरेंना पत्रकारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज ठाकरे यांनी एका वाक्यातच पुन्हा राऊतांवर निशाणा साधला.

काल हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. आज राज ठाकरे त्याला काय उत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. कालच संजय राऊतांनी राज ठाकरे यांना 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष होते. ''संजय राऊत यांनी तुम्हाला 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधलं आहे,'' यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ''मी आज लवंड्याबाबत काही बोलणार नाही,''

गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढणाऱ्या राज ठाकरेंवर संजय राऊतांनी (Sanjay Raut)टीका केली होती. 'शिवाजी पार्कात भाजपचे भोंगे वाजत होते,' असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे.

''नुसत्या प्रॉपर्टी जप्त केल्या तर हे लागले शिव्या द्यायला. संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? आमच्या आजोबांनी म्हणजेच प्रबोधनकारांनी अशा लोकांसाठी एक चांगला शब्द शोधला आहे. तो म्हणजे लवंडे...नीट शब्द पाहा अनुस्वार व वर आहे'', असं म्हणत राज यांनी राऊतांना डिवचलं होतं.

संजय राऊतांनी एका ओळीचं टि्वट करीत राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. ''दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र,'' असे म्हणत राऊतांनी एका अर्थानं 'मनसे हा संपत चाललेला पक्ष आहे,' असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT