पुणे

पुण्यात मनसेला लोकसभेसाठी हवाय तगडा उमेदवार!

उमेश घोंगडे

पुणे : लोकसभा निवडणूक पुण्यात लढवायची की नाही या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची द्विधा मनस्थिती आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. मात्र लोकसभा लढू शकेल, असा तगडा उमेदवार नसल्याने पक्षाची अडचण झाली आहे. 

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे मुंबईनंतर पुण्यावर अधिक लक्ष आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी किमान चारवेळा पुण्याचा दौरा करीत संघटनात्मक बांधणीत लक्ष घातले आहे. शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष व शाखाध्यक्षांच्या माध्यमातून संघटना बांधली आहे. शहरात पक्षाला आणि राज ठाकारे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यात तरूणांची संख्या लक्षणीय आहे.

2012 साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आले. त्याआधी विधानसभा निवडणुकीतही पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले होते. पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. त्यात पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून रमेश वांजळे हेदेखील निवडून आले आहेत.

सुरवातील पक्षाला शहरातून चांगले वातावाण होते. मात्र 2014 ची विधानसभा व त्यानंतर गेल्यावर्षी झालेली लोकसभा निवडणुकीचे निकाल पक्षासाठी निराशाजनक होते. मधल्या काळात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. महापालिका निवडणुकीत हे प्रमाण मोठे होते. त्यामुळे शहराध्यक्षपदाची जबाबदारी अजय शिंदे यांच्याकडे स्वतंत्रपणे देऊन गेल्या वर्षभरात पुन्हा नव्याने पक्षसंघटना वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गेल्या वर्षभरात संघटना बांधणी झाली असली तरी लोकसभेसाठी सक्षम उमेदवार पक्षाकडे नाही. त्यामुळे मुळात पक्षाने पुण्यात उमेदवार उभा करायचा का यावर कार्यकर्त्यांचे एकमत होत नाही. उमेदवार उभा करायचा झाला तर सक्षम उमेदवार कोण याचे उत्तरदेखील मिळत नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT