Sanjay Raut, Vasant More
Sanjay Raut, Vasant More  sarkarnama
पुणे

MNS : वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट ; चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

पुणे : भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसे (MNS) नेते वसंत मोरे यांना थेट (Vasant More) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा गेल्या महिन्यात होती. त्यानंतर पुन्हा एकदा वसंत मोरे यांना शिवसेनेनं ऑफर दिली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Vasant More latest news)

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केल्या नंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले.

माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा "मी मनसेतच आहे. मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार," असे मोरे यांनी स्पष्ट केले होते.

आज (बुधवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वसंत मोरेंनी भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पु्ण्यात एका लग्रात राऊत आले होते, तेव्हा मोरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राऊतांनी मोरेंच्या कामाचं कौतुक केलं. राऊतांनी मोरेंना 'तात्या'म्हणून हाक मारली. त्यांनतर संजय राऊत यांनी मोरे यांचं ठाण्यातील भाषण ऐकलं होतं.

जाता जाता मोरेंना संजय राऊत 'भेटू' असे म्हणाले. त्यामुळे वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर राऊतांनी दिली का, अशी चर्चा सुरु झाली आहे. वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरुन हटविल्यानंतर अनेक पक्षाच्या त्यांना ऑफर येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT