वडगाव निंबाळकर : ``देशात दोन पंतप्रधान असावेत याबाबत कॉग्रेस अथवा राष्ट्रवादीचे कोणी काही बोलले नाही. मोदींची जात कोणी काढली नाही. पण बळचं मोदी आपल्या पुड्या सोडत आहेत. उलट भाजपाच्या लोकांनी मारूतीची जात काढली. भावनिक मुद्दे काढून मतदारांची ते दिशाभूल करीत आहेत,`` अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
बारामती लोकसभेच्या उमेद्वार सुप्रिया सुळे यांची प्रचारसभा वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे झाली. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले की पंतप्रधान लोकांना भावनिक करून जातीचा आधार घेउन बोलतात, हे बरोबर नाही. साखर कारखान्यांनी ऊस गाळपाबरोबरच इथेनॉल निर्मितीसह इतर बायप्रोडॉक्ट वाढवावेत यासाठी पवार साहेबांनी मदत केली. एफआरपीची रक्कम देण्यासाठी कमी व्याजाने पैसे उपलब्ध करून दिले. साखर उद्योगाला नवसंजवनी साहेबांनी दिली. असे असताना खुशाल मोदी लोकांना चुकीची माहिती देतात, म्हणे पवारांनी साखर उद्योगासाठी काय केले?
``माझ्यासमोर बसलेल्या सोमेश्वरच्या सभासदांना विचारा. नऊ वर्षांपूर्वी आम्ही बायप्रोडॉक्ट काढले आहेत. खासगी कारखाने आम्ही काढल्याचा आरोप केला. मग भाजप कार्यकर्त्यांचे खाजगी कारखाने नाहीत का? तुमचे सरकार केंद्र आणि राज्यात होते. तेव्हा का नाही खासगी कारखाने बंद केले, असा सवाल करत लोकांची दिशाभूल करून मते मिळणार नाहीत, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
पीक विम्यांच्या पैशातून विमा कंपन्या सुधारल्या, हे सर्वांना माहीत आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी मोदींनी जातीचा उल्लेख केला आहे. पाच वर्षे काम केले पण आमच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही, असे मोदी बोलले. राफेलचं विमान चढ्या भावान का घेतल? राफेलची कागदपत्र चोरीला कशी गेली? एकनाथ खडसेंना का राजीनामा द्यावा लागला? चिक्की घोटाळा कोनी केला? महिला बालकल्याण विभागाचे एक टेंडर कोर्टाने रद्द का केले? मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले. असे सर्व मुद्दे असताना पंतप्रधान म्हणतात आमच्यावर डाग नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.