Narendra Modi Sarkarnama
पुणे

मोदींचा पुणे दौरा लवकरच : पालिका बरखास्तीआधी भाजपा वापरणार हुकमी एक्का

पुणे महापालिकेची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे.त्यानंतर महापालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा गेल्या महिन्यात स्थगित करण्यात आलेला पुणे दौरा या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठड्यात होण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोचे उद्घघाटन, महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण यासह आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उदघाटन तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजनाचे कार्यक्रम या दौऱ्यात होणार आहेत.

पुणे महापालिकेची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे.त्यानंतर महापालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीच्यावतीने निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.या पाश्‍र्वभूमीवर सत्ताधारी भाजपाची पंतप्रधान मोदी यांना पुण्यात आणून निवडणकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची योजना आहे.

गेल्या महिन्यात १८ जानेवारीला पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ठरला होता. मात्र.त्या काळात पुण्यातल्या वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.दरम्यानच्या काळात मेट्रोची काही राहिलेली कामे उरकून घेण्यात येत आहेत. नळस्टॉप चौकातल्या पुलाचे कामदेखील या काळात पूर्ण होत आले असून येत्या पंधरा दिवसात मेट्रोकडून हा पूल वाहतुकीसाठी महापालिकेच्या ताब्यात देणार येणार आहे.

नदी संवर्धन योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान आवास योजनेतील एक हजार घरांचे वाटप तसेच ‘पीएमपीएमएल’ने केंद्र सरकारच्या निधीतून घेतलेल्या ‘ई-बस’चा लोकार्पण सोहळा यावेळी होणार आहे.नदी संवर्धन योजना महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार या योजनेचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, जपानी कंपनी ‘जायका’च्या निधीतून करण्यात येणाऱ्या प्रकल्पाला अद्याप अंतीम मंजुरी मिळालेली नाही. येत्या काही दिवसात या प्रकल्पालादेखील मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे भाजपाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षात पुणेकरांसाठी विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.या सर्व कामांचे लोकार्पण तसेच भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क सुरू असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.येत्या काही दिवसात पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळणे अपेक्षित आहे.त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

पुण्यात मेट्रोच्या कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर या दोन स्टेशन दरम्यान प्रवास करून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. बाणेर येथे उभारलेल्या आर. के.लक्ष्मण कला दालनाचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन ‘ऑनलाइन’ न करता कला दालनाला पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT