Mohan Joshi - Girish Bapat sarkarnama
पुणे

मोहन जोशींनी केला भाजपाच्या अपयशाचा पंचनामा

मुसळधार पावसामुळे शहरात शनिवारी साचलेले पाणी, रस्त्यावरचे जागोजागी पडलेले भयावह खड्डे यातून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अपयशी कारभाराचाच पंचनामा झाला.

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुसळधार पावसामुळे शहरात शनिवारी साचलेले पाणी, रस्त्यावरचे जागोजागी पडलेले भयावह खड्डे यातून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अपयशी कारभाराचाच पंचनामा झाला, अशी खरमरीत टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

गेले काही महिने शहरातील सर्वच रस्त्यांवर भयावह खड्डे पडले आहेत. रस्ते दुरुस्तीही सत्ताधारी भाजपाला जमलेली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी केली, साध्य काहीही झाले नाही. मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मीरोड तर दुरुस्ती नंतर अधिकच बिघडला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. गेले दोन, तीन वर्ष सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडतो आणि भीषण परिस्थिती उदभवते. हे लक्षात घेऊन सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करायला हवी होती.

केवळ टक्केवारीत रमलेल्या महापालिकेतील भाजपा नेत्यांनी या कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे कात्रज, बिबवेवाडी, धानोरी, बालेवाडी वगैरे उपनगरांमधील रस्ते पाण्यात बुडाले. तास, दीडतासाने पाणी ओसरल्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पावसात अडकलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. या पावसाने स्मार्ट सिटी म्हणून उदोउदो करणाऱ्या भाजपाच्या कारभाराचा पंचनामाच केला, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले. रस्त्या़ंची कामे निकृष्ट दर्जाची झाली. दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा करण्यात आला. याबाबत भाजपाचे नेते खासदार गिरीश बापट, आमदार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गप्प आहेत. आपल्या नगरसेवकांना जाब विचारण्याचे धाडस त्यांच्यात नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी म्हणून निवडलेल्या बाणेर, बालेवाडी भागातही पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, अशी टीका जोशी यांनी केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT