पुणे

तेंडुलकरच्या दहा हजार धावांपेक्षा सावरकरांच्या भिंतीवरील ओव्या महत्वाच्या

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : "तेंडुलकरच्या दहा हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या दहा हजार ओव्यांचे अधिक कौतुक वाटले पाहिजे", असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी व्यक्त केले. ते चिंचवड येथील कलारंग संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कलारंग संस्थेने 25 वर्षात पदार्पण केले, या निमित्ताने " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भविष्यातील भारत " या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले ,"हिंदुचे सैनिकीकरण व राजकियीकरण झाले पाहिजे असे सावरकरांचे म्हणणे होते. त्यामुळे हिंदूंनी मतदानाला जाताना हिंदू म्हणून विचार केला पाहिजे. मागील ६५ वर्षात एका परिवाराचा मोठेपणा दाखविण्यासाठी इतर स्वातंत्र्यसेनानींकडे दुर्लक्ष झाले, महिलांची उपेक्षा झाली. पण मोदींनी त्यांचा विचार केला. महिलांसाठी अनेक योजना राबवून महिलांचा सन्मान केला. देश बगलत असून पुढे जात आहे.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद बन्संल, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे तसेच शंकर जगताप, एकनाथ पवार, राजू दुर्गे, मोरेश्वर शेंडगे आदी उपस्थित होते. १९४७ मध्ये आपल्याला फक्त आझादी मिळाली होती. भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारांचे खरे स्वांतत्र्य २०१४ नंतर मिळाले. या आधी भटक्या-विमुक्त, जनजातींच्या लोकांवर जन्मापासून गुन्हेगारीचा शिक्का मारला जात होता, आता तो पुसण्याचे काम सुरू आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला पुन्हा लक्ष केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT