Amol Kolhe News  Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : खासदार कोल्हेंची अजित पवारांशी वाढती जवळीक; शरद पवारांची साथ सोडणार ?

NCP Political News : शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध चांगले आहेत.

Deepak Kulkarni

चैतन्य मचाले -

Pune News : लोकसभा अध्यक्ष तसेच राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा,या मागणीसाठी अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्यासह शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

डॉ.कोल्हे यांचे नाव वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाने कोल्हे यांचे नाव वगळल्याने अजित पवारांना पाठिंबा देत डॉ. कोल्हे शरद पवार यांची साथ सोडणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ कोणाचे यावरून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटात जोरदार वाद सुरू आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात याची लढाई सुरू आहे. शरद पवार यांना पाठिंबा असलेल्या खासदारांवर कारवाई करून त्यांना अपात्र करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केलेली आहे.

या याचिकेत शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार डॉ कोल्हे,वंदना चव्हाण, मोहम्मद फैजल,फौजिया खान,यांच्यावर कारवाई करून त्यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, यामधून शरद पवार,सुप्रिया सुळे यांची नावे वगळण्यात आलेली आहेत.तसेच खासदार डॉ. कोल्हे यांचेही नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध चांगले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत हे दोघे स्टार प्रचारक होते. दीड वर्षापूर्वी कोल्हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात शिवसेनेर फूट पडली. त्यानंतर शिरूर मध्ये ज्यांच्या विरोधात कोल्हे यांनी निवडणूक लढविली होती. ते शिवाजीराव आढळराव पाटील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे कोल्हे यांच्या भाजपच्या प्रवेशाची चर्चा थंडावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या शपथविधीवेळी स्वतः कोल्हे राजभवनात हजर देखील होते. त्यावेळी ते अजितदादा गटाला पाठिंबा देतील, असे संकेत होते. मात्र, आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात असल्याने लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळाल्यास होणारी अडचण लक्षात घेत कोल्हे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याचे टाळले आहे.

राष्ट्रवादीमधील सत्ता संघर्ष संपुष्टात येण्यापूर्वीच लोकसभा निवडणूक लागल्यास शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, याची कल्पना कोल्हे यांना आहे. त्यामुळे जरी अजित पवार यांना जाहीर पाठिंबा देता नाही आला तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून कोल्हे यांनी कधीही अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्री यांच्यावर कडक शब्दात टीका टिपण्णी केलेली नाही.

याउलट शरद पवार गटाच्या कोणत्याही सभा-संमेलनांना, मोठ्या कार्यक्रमांना, ते उपस्थिती लावत नाहीत. शक्य असेल तितके अंतर राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अजित दादा आणि शरद पवार यांनी एकत्रित यावे, अशी भूमिका त्यांनी यापूर्वी अनेकदा जाहीर कार्यक्रमात मांडली आहे.

अजितदादा आणि शरद पवार यांच्यातील लढा आता निर्णायक टप्प्यांवर येऊन पोहचला आहे. शरद पवार यांच्या गटाच्या युक्तिवादानंतर आता अजित दादा यांचा गट युक्तिवाद करणार आहे. कोल्हे हे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाल्यास त्याचा मोठा फायदा अजित दादा गटाला होऊ शकतो. त्यामुळेच कारवाईच्या याचिकेतुन त्यांचे नाव वगळून त्यांचा पाठींबा मिळविण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT