NCP Support to  Wrestlers Protest:
NCP Support to Wrestlers Protest:  Sarkarnama
पुणे

NCP Support to Wrestlers Protest: खासदार ब्रिजभूषण यांना अटक झालीच पाहिजे, नाहीतर...; राष्ट्रवादीचा भाजपला थेट इशारा

उत्तम कुटे: सरकारनामा

NCP Support to  Wrestlers Protest : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह (Brijbhushan Sharansinh) यांच्याविरोधात गेले महिनाभर दिल्लीत आंदोलन करणारे ऑलिम्पिक पदक विजेते महिला व पुरुष कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी परवा (ता.२८) नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी चिरडून टाकले. एवढेच नाही, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण करत ताब्यात घेतल्याने गेले दोन दिवस देशभर त्याविरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. (MP Brijbhushan must be arrested, otherwise...; NCP direct warning to BJP)

पिंपरी-चिंचवडमध्ये दिल्लीतील वरील घटनेची प्रतिक्रिया आज उमटली.शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत महिला कुस्तीपटूंना (Wrestlers Protest) झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आज आंदोलन केले. ब्रिजभूषण शरणसिंह यांना अटक झालीच पाहिजे, खिलाडियों के सन्मान में राष्ट्रवादी मैदान मे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.

महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, सामाजिक नेते देवेंद्र तायडे, व्हीजेएनटी सेल अध्यक्ष राजू लोखंडे, अर्बन सेल महीला अध्यक्ष मनीषा गटकळ, व्ही.जे.एन.टी सेल महिला अध्यक्ष निर्मला माने आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. ब्रिजभूषण सिंहांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर आणखी तीव्र आंदोलन यापुढे घेण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे महिला कुस्तीपटू आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करीत होते परंतु यांना संसद भवनाचे उद्घाटन करण्यातच जास्त रस दिसत होता. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे, असा हल्लाबोल यावेळी प्रा.आल्हाट यांनी केला. घडलेले हे दृश्य मान शरमेने झुकवणारे आणि अंतर्मुख करायला लावणारे आहे. लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल होते की काय असे आता वाटू लागले आहे,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Edited By- Anuradh Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT