Sarkarnama Open mic| Imtiaz Jaleel | Sharad Pawar
Sarkarnama Open mic| Imtiaz Jaleel | Sharad Pawar Sarkarnama
पुणे

सरकारनामा Open mic : इम्तियाज जलील म्हणतात, शरद पवार म्हणजे...

सरकारनामा ब्युरो

Sarkarnama Open mic

पुणे : राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप आणि नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. असे असतानाच नेहमीचे राजकीय भाषण, दौरे, डावपेच, टिकाटिपण्णी अशा सगळ्या वातावरणातून बाहेर येत सरकारनामा ओपन माईक चॅलेंज या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी धमाल उडवून दिली.

यावेळी राज्याच्या उद्योग, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार इम्तियाज जलील, श्रीकांत शिंदे, आमदार धीरज देशमुख, परिणय फुके आदी उपस्थित होते. सरकारनामा ओपन माईकच्या 'फेसऑफ'मध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी फेसऑफमध्ये ही राजकीय मंडळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा छायाचित्रांवर आपल्या बेधडक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अभिनेत्री कंगना राणावत भाजपची भावी राज्यसभा खासदार असल्याचे भाकित खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी वर्तवले. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ड्रामा क्विन असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आमदार राम कदम म्हणजे बडबड. जगाच्या बाहेरच्या प्रश्नांवरही त्यांच्याकडे उत्तर असते, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा पाहून जलील आवाक् झाले. अरे बाप रे ! मी घाबरलो.. ईडी, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला.

दिवाळखोर विजय मल्ल्या शो मॅन. तर अनिल देशमुखांचा चेहरा दाखवला असता त्यांना १०० कोटींचा आकडा त्यांना आठवला. कॉंग्रेस नेते शशी थरुर म्हणजे जिकडे गुळ तिकडे माशी, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे जगासाठी धोकादायक माणूस असल्याचं त्यांनी सांगितलं.

यात खासदार जलील यांनी खासदार शरद पवारांविषयी विशेष प्रतिक्रिया दिली. फेसऑफमध्ये त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांचा चेहरा दाखवला असता, जलील म्हणाले की,' जे बोलतात, ते करत नाही, मात्र जे करतात ते बोलून दाखवत नाही.'' तर, कितीही महाराष्ट्रात करा मात्र ना ना.. ना होणार असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खिल्ली उडवली.

तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीदेखील फेसऑफ कार्यक्रमात मजेशीर उत्तरे दिली. रामदास आठवलेंचा चेहरा दाखवाला असता, गो कोरोना गो ही कविता आठवत असल्याचे ते म्हणाले. दिवंंगत बाळासाहेब ठाकरे सगळ्यांसाठी हिंदू हृदयसम्राट आणि आमच्यासाठी दैवत असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे पाहून आपले बारा थांबवून ठेवले ना, अशी आठवण त्यांनी सांगितली. ईडीचे चित्र पाहून त्यांनी, काय ओ नेक्स्ट नंबर कोणाचा आहे?, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार परिणय फुके यांना केला.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र पाहून पंधरा लाख कधी येणार ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम ऊन जोंग म्हणजे पुतीन यांची छोटी आवृत्ती असल्याचे त्यांनी म्हटले. आता खूप झालं. महेश मांजरेकर - चांगला डिरेक्टर आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतो' हा चित्रपट आवडत असल्याचही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर हा जबरदस्त अभिनेता आहे. बिचकुलेंवर काय बोलावे, असा सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT