Medha Kulkarni  Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni : 'कुछ कह गए, कुछ सह गए...', निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट

BJP Candidate List Pmc Election : पुणे भाजपने तब्बल 45 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. नवीन चेहऱ्यांना संधी म्हणत आयारामांना तिकीट दिल्याची चर्चा होत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच पुण्यामध्ये निष्ठावंत विरोधात आयात उमेदवार अशी चर्चा रंगली आहे. पुण्यातील वाढलेली भाजपच्या ताकदीमुळे यंदा महापालिका निवडणूक ही भाजपासाठी थोडी सोयीची असल्याने जास्तीत जास्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश पाहायला मिळाले.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक निष्ठावंतांना उमेदवारी पासून दूर राहावे लागले. आणि नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेले निष्ठावंत सध्या सोशल मीडियाच्या माध्यम आणि इतर विविध माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. तसेच काहींनी माध्यमांसमोरच अश्रू अनावर झाले. काहींनी थेट पक्ष नेत्यांचे पोस्टर फाडले आणि काहींनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला.

पुणे भाजपने तब्बल 45 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. तसेच पुण्यामधून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचा पाहायला मिळाले. भाजप कडून तब्बल अडीच हजार लोकांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे नाराजांची संख्या ही मोठी आहे. ही नाराजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला परवडणारी नाही.

अशातच खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत. गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, 'कुछ कह गऐ, कुछ सह गऐ, कुछ कहते कहते रहे गऐ' तसेच आपल्या पोस्टमध्ये निष्ठावान कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT