sanjay raut, Devendra Fadnavis sarkarnama
पुणे

ठाकरे सरकार पुरुन उरलं..भाजप दिशाहीन झालाय!

''उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी भाजपनं राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे,'' असं संजय राऊत (mp sanjay raut) यांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी रविवारच्या 'सामना'तील 'रोखठोक'मधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ''महाविकास आघाडी सरकार(Thackeray government) पाडणार,'' असं म्हणणाऱ्या भाजपनेत्यांवर राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे,'' असं संजय राऊत (mp sanjay raut) यांनी म्हटलं आहे. त्यांनी ''दोन वर्षांचा काळ सरला! राज्य किती पुढं गेले'' अशा शीर्षकानं रोखठोक लिहिलं आहे.

''काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं,'' असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार (Thackeray government) पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी,'' असा सल्ला राऊतांनी विरोधकांना दिला आहे.

''भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकात आता लवकरचं पडेल असं म्हटलंय. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे,'' असा सवाल राऊत यांनी केला आहे.

''गेल्या दोन वर्षात सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय,'' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

काय म्हटलं आहे 'रोखठोक' मध्ये

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, ते लोकांमध्ये प्रिय आहेत.

  • कोरोनाच्या संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा आश्वासक होता.

  • उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळं राज्यावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले

  • मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT