MP Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule: राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच 'लाडकी'; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

MP Supriya Sule on Rajkot Fort Incident : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची आठवण आली नाही, लोकांनी त्यांना जागा दाखवून दिल्यानंतर आता ते बहिणीकडे पाहत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Baramati News: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुतळ्यांचा शिल्पकार आणि बांधकामाचा सल्लागार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. विविध नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

"मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाबाबत (Shivaji Maharaj Statue Controversy) झालेली घटना ही वेदनादायी व दुःखदायक आहे, राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच 'लाडकी' झाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी," अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी व्यक्त केली.बदलापूरच्या घटनेनंतर लोकांच्या मनात प्रचंड राग आहे, लोक रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार जागे झाले, असे सांगत सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज तीन हत्ती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना गृहमंत्री फडणवीस कोठे आहेत असा सवाल त्यांनी केला. हे सरकार असंवेदनशील असून आगामी निवडणुकीत सरकारला सत्तेवरुन खाली खेचा, असे आवाहन सुळे यांनी केले.

"लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची आठवण आली नाही, लोकांनी त्यांना जागा दाखवून दिल्यानंतर आता ते बहिणीकडे पाहत आहेत, आम्ही तुम्हाला दोन हजार देतो पण आयाबहिणींची सुरक्षितता जपा असे आता महिलाच म्हणून लागल्या आहेत. राज्यातील महिला सुरक्षित राहायलाच हव्यात या साठी रस्त्यावर उतरणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे," असे सुळे म्हणाल्या.

या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, 'आप'सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले होते. बारामतीच्या विविध प्रश्नांबाबत आपण नंतर एकत्र बसून सविस्तर चर्चा करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT