Supriya Sule attacked On MLA Hasan Mushrif Sarkarnama
पुणे

Supriya Sule: 'तो' फोटो पाहताच सुप्रियाताई म्हणाल्या, 'बायकोच्या अश्रूंची किंमंत काय कळणार...'

MP Supriya Sule attacked On MLA Hasan Mushrif: माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी लढले असते. मी म्हटलं असते चौकशी करा. विनम्रपणे झुकले नसते. आम्ही खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत,"

Rahul Gadkar

Kolhapur Political News: केंद्रीय मंत्री अमित शाह काल (बुधवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाह यांचे स्वागत केले. स्वागत केल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ आणि अमित शहा यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. अमित शाह आणि पालकमंत्री असं मुश्रीफ यांच्या भेटीचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहिला अन् त्यांचा पारा चढला. पालकमंत्री मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांनी मुश्रीफ यांचा समाचार घेतला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी डर्टी डझन नावाची सिरीयल काढली. डर्टी डझन अजून कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न आहेत. काल एका डर्टी डझनमधील एकाचा फोटो मी अमित शाह यांच्याबरोबर बघितला.

अतिशय नम्रपणे ते भेटले. अमितजी ज्यांना एक वर्षांपूर्वी एक डर्टी डझन म्हणत होते. तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शाह भेटले. मला कौतुक दोघांचाही वाटतं. अशा शब्दात खासदार सुप्रियाताईंनी समाचार घेतला.

त्यांच्या घरावर ज्यावेळी ईडीने कारवाई केली होती, यावेळी त्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवंडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडीची पीडा तुमच्या घरात पाठवली, तुमच्या नातवंडांचे हाल झाले. त्यांना विनम्रपणे तुम्ही अभिवादन करत होता.

राम कृष्ण हरी. मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असतं. माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी लढले असते. मी म्हटलं असते चौकशी करा. विनम्रपणे झुकले नसते. आम्ही खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत," अशा शब्दात सुप्रियाताईंनी मुश्रीफ-शाह भेटीवर हल्लाबोल केला आहे.

ज्यावेळी ईडीचा आरोप केला, ज्यांच्या घरी ईडी पाठवली, तुमचा पक्ष ज्यांना डर्टी डझन म्हटला होता. मग तो आरोप खोटा होता, एवढं तरी अमितजी यांनी खरं बोलावं. जर हे खोटं असेल तर मुश्रीफ यांनी सांगावं सांगावं की हो, अमित शाह यांनी माझी माफी मागितली आहे. की माझ्या घरावर हल्ला केला माझ्या नातवडांना दूध दिले नाही.

माझी बायकोची अश्रूंची किंमत अमित शाह यांनी घरात येऊन फेडली. म्हणून मी अमित शाह यांना हस्तांआंदोलन केले. अरे बायकोच्या अश्रूंची किंमत काय माहिती, एका महिलेला तिचे दुःख माहिती असते. काय लढली आहे, मुश्रीफ यांची बायको. तिला मानले पाहिजे. त्या महिलेचा मला नेहमीच अभिमान आहे, अशा शब्दात सुप्रियाताईंनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT