Udayanraje Bhosale  Sarkarnama
पुणे

Udayanraje Bhosale Video : 'मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, फुलेंनी त्यांचे...', उदयनराजेंच्या दाव्याने खळबळ

First Girls School Udayanraje Credits Pratapsingh Maharaj Maratha : अरबी स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे. पर्यावरणाच्या काही अडचणी असतील तर तेथे स्मारक न करता राजभवनाच्या जागेवर करावे, असे उदयनराजे म्हणाले.

Roshan More

Udayanraje Bhosale Statement: महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना थोरले प्रतापसिंह महाराज यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केल्याचा दावा केला.

उदयनराजे म्हणाले, 'थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांचे अनुकरण महात्मा फुलेंनी केले. कारण त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वप्रथम शाळा कोणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी ती सुद्धा सातारच्या त्यांच्या राजवाड्यात.'

उदयनाराजे पुढे म्हणाले की, राजवाड्यात शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच राजवाड्यात देशाचे संविधान लिहिणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील शिक्षण झाले.

उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिधी आहे. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्यांवर कारवाई केली जावी. या गुन्ह्यात त्यांना विनावाॅरंट अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. याविषयी मी अमित शाह यांना निवेदन दिले आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले.

राजभवनात स्मारक उभारा

अरबी स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे. पर्यावरणाच्या काही अडचणी असतील तर तेथे स्मारक न करता राजभवनाच्या जागेवर करावे. राजभवनाची 48 एकर जागा आहे. आणि ती समुद्राला लागूनच आहे. एखाद्या राज्यपालाला राहण्यासाठी जागा लागते तरी किती? 48 एकर म्हणजे काही थोडी जागा नाहीये , असे उदयनराजे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT