Udayanraje Bhosale On Retirement  Sarkarnama
पुणे

Udayanraje Breaking News : जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघालेल्या उदयनराजेंचा दौरा तडकाफडकी रद्द; चर्चांना उधाण

Deepak Kulkarni

Pune News : जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगेंच्या लढ्याला आत्तापर्यंत सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या नेत्यांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

याचदरम्यान, भाजप खासदार उदयनराजे (Udyanraje Bhosale) हे जरांगेच्या भेटीसाठी जालन्याला जाण्यासाठी सोमवारी निघाले होते, पण मध्येच त्यांनी हा जालन्याचा दौरा रद्द करत पुण्यात थांबणे पसंत केले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनावेळी वेळ न दवडता थेट जालना गाठले होते. त्यावेळी सत्तेतील पक्ष असलेला भाजप पक्षाचे खासदार असताना उदयनराजेंनी मनोेज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला लावलेल्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.

खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उदयनराजेंच्या भूमिकेचे कौतुक केले होते. तसेच मराठा आरक्षणासाठी खासदारकीवर पाणी सोडण्याची भूमिकाही बोलून दाखवली होती. पण आता याच खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, चर्चेलाही उधाण आलं आहे.

खासदार उदयनराजे यांनी त्यांचा जालना दौरा तडकाफडकी रद्द करत अचानक पुण्यात थांबा घेतला आहे. ते अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस आहे. त्यांनी बोलत आहे तोपर्यंत चर्चेला येण्याचे आवाहन सरकारला केलं आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.

पण सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी निघाले होते. पण ते आता पुण्यात थांबले आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून लोकप्रतिनिधींच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या घरावर धडक दिली. (Maratha reservation Protest)

दुसरीकडे, कोल्हापूरमध्येसुद्धा मराठा आरक्षणासाठी आता ठिणगी पडली आहे. कोल्हापुरात दसरा चौकामध्ये साखळी उपोषणाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मराठा समाजातील कार्यकर्तेही मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्यामध्येसुद्धा मोठा वणवा पेटला असून, राजीनामास्त्र सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनासुद्धा आता याचे फटके बसू लागले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT