CM Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Pune News: मुख्यमंत्र्यांना 'लक्ष्य' करणाऱ्या तरुणाला पुण्यातून घेतलं ताब्यात

Police Arrests Pune Student For Giving Death Threats To CM Eknath Shinde: मुंबई पोलिसांची कारवाई; कॉम्प्युटर ग्रॅज्युएट असलेल्या तरुणाकडून शिंदेंबाबत सोशल मीडियावर धमकी

Chaitanya Machale

Pune News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल सोशल मीडियावर धमकीची पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुणे शहरातून या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याला चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी तरुण 19 वर्षीय असून कॉम्प्युटर ग्रॅज्युएट आहे. त्याने कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याचे मूळ गाव नांदेड असून सध्या तो पुण्यात राहतो. या तरुणाने एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल गंभीर अशी पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांना याची माहिती मिळताच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून त्यांनी पुण्यामधून या तरुणाला ताब्यात घेतले आणि मुंबईला चौकशीसाठी नेले आहे. गुंड कसे बनायचे, या विषयावर एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. या पोस्टला उत्तर देण्यासाठी आरोपी तरूणाने एक पोस्ट केली. यामध्ये त्याने म्हटले होते की, ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदुक द्यायला तयार आहे.

ही पोस्ट एका यूजर्सने बघितल्यानंतर त्याने पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत पोस्टची खात्री जमा केली आणि अधिकची माहिती मिळवली असता संबंधित तरुण हा पुण्यात राहत असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशीसाठी मुंबईला नेले आहे. तेथे चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल करण्यात आलेल्या या पोस्टमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT